सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. कोण..कोणाचे...कशासाठी?
90 100
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

कोण..कोणाचे...कशासाठी?

By: श्रीराम विष्णू साठ्ये ,

Book Details

  • Edition:2015
  • Pages:112 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-01-2

१० लघुकथांचा संग्रह असलेले हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या चौकस बुद्धीचे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नेहमीच्या घटनांचे केलेले निरीक्षणात्मक लिखाण आहे. पुस्तकातील प्रत्येक कथेचे आपले असे वैशिष्ट्य लिखाणातून कळून येते.

राख्या या कथेमधून अतिशय लहान दुर्गम अशा खेड्यात राहणाऱ्या माणसाचे कालेवारचे विलक्षण प्रेम, त्याचे अजोड परिश्रम, त्याची समर्पणवृत्ती आणि झपाटलेल्या अवस्थेतच त्याचा झालेला दुर्दैवी अंत हे मनाला विलक्षण चटका लावणारं आहे.

उथळ,चेष्टेखोर असूनही माणुसकीचा ओलावा जपून असलेला तात्या खोटेही लेखकाने आपल्या लेखणीतून परीणामकारकपणे उतरवला आहे.त्यांची शिकंदी ही कथा मनाला आणि विचारशक्तीला खाद्य पुरवणारी आहे. भिकेच्या माध्यमातून आपल्या बांधवांसाठी सामाजिक प्रकल्प उभारणारा महेश पाटोळे ही लेखकाने सुन्दर वर्णन केला आहे.

दगडू शेवाळेच्या रूपाने प्रेम,काबाडकष्ट करून कुटुंबाच्या भविष्यासाठी आपले वर्तमान पणाला लावणारा आदर्श पुरुष वाचकांसमोर लेखकाने उभा केला आहे.लहानपण देगा देवा या कथेच्या माध्यमातून वृद्धत्व आणि त्यातून नातीसोबतचे सुंदर नाते उलगडले आहे. काही कथांमधून नव्या आणि जुन्या पिढीत असलेले ऋणानुबंध अधोरेखीत होतात.

एकूणच समाजातल्या सर्व वर्गांसाठी अतिशय वाचनीय असे हे पुस्तक आहे.

श्रीराम विष्णू साठ्ये