-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
ओलावा
Book Details
- Edition:2015
- Pages:80 pages
- Publisher:Sunidhi Publishers
- Language:Marathi
- ISBN:978-93-85262-02-9
या पुस्तकातून लेखकाने निसर्गाची विविधता,सौंदर्य,उदारता त्यातील झाडे,पाने,फुले आणि वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामाईक आहे आणि त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे या पुस्तकाच्या वाचनातून वाटत राहते.
तीन दंपती अनेक गमती जमती या कथेतून नवविवाहित जोडप्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या सहजीवनात घडणाऱ्या विनोदी प्रसंगांचे वर्णन केले आहे, कालपुरुष या कथेतून खेडेगावात जन्मलेल्या,शिक्षणासाठी पायपीट करावी लागणाऱ्या विद्यार्थ्याच्या शालेय जीवनाचे, मित्रत्वाचे जीवन लिखाणातून रेखाटले आहे. ग्रामीण भागावर असलेल्या अंधश्रद्धेचा पगडा ही या कथेतून मांडला आहे.
फिरुनी नवे जन्मेन मी कथे तून मुक्या पक्षाशी पण कसा मूकसंवाद साधता येतो याच वर्णन आढळतं. एकटा या कथेच्या माध्यमातून निवडुंग आणि पतंगाच्या रूपाने केलेले सृष्टीधार्माचे वर्णन हे मानवाच्या परस्पर विरोधी विशेषणांना अगदी चपखल बसते.
आधार या कथेच्या माध्यमातून आधारवृक्ष म्हणून विशेषण लाभलेल्या वटवृक्षाची आजकालच्या काळात झालेली दुरावस्था मांडली आहे . लेखाने कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेचा निसर्गाशी जोडलेला संबंध आढळतो.