-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
सदारंग-अदारंग-भारतीय संगीतातील दोन रंग
Book Details
- Edition:2014
- Pages:157 pages
- Publisher:Sunidhi Publishers
- Language:Marathi
- ISBN:978-81-927375-6-0
लेखिकेने या पुस्तकातून भारतीय संगीतातील विविध सौज्ञांची या क्षेत्रातील कलावंताना आणि रसिकांना एक वेगळीच ओळख करून दिली आहे.गायकीच्या विविध शैलींचा, त्यात अंतर्भूत असलेल्या ताल, सूर आणि स्वर यांचा आभ्यासात्म्क परीसंवादच केल्यासारखे विवरण मांडले आहे.
बंदिशीतील रागरूप हा मुद्दा स्पष्ट करताना रागरूपातील मुख्य स्वरसंगतीचा वापर बंदिशीच्या मुखड्यामधे कसा परिणामकारक केला गेला त्याचे सुरेख वर्णन लेखिकेने या पुस्तकातून केले आहे. बंदिशीमधे सम साधणे,अंतऱ्यातला विशिष्ठ स्वर आणि आणि ठेक्याचे सुरवातीचे अक्षर यांचे नादाघात हे एकाचवेळी होणे ही बंदिशीच्या मांडणीतील किती महत्वाची क्रिया आहे याचे अभ्यासपूर्ण वर्णन केले आहे.
भारतीय संगीताचा रागसादरीकरण हा मुख्य उद्देश कसा आहे,त्याचे रूप कसे आहे याचे विश्लेषण लेखिकेने या पुस्तकातून केले आहे.
स्मिता मादुस्कर
लेखिका अभिजात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक आहेत. त्यात त्यांनी बरेच संशोधनात्मक साहित्य लिखाण केले आहे.