सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. लॉकडाऊन Positivity
180 200
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

लॉकडाऊन Positivity

By: सुनिधी Positive टीम ,

Book Details

  • Edition:2020
  • Pages:134 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-29-6

सुनिधी पब्लिशिअर्स आणि कोलंबस पब्लीशिंग अँड सर्विसेस यांच्या संयुक्त प्रकल्पातून निर्मिती झालेले हे पुस्तक आहे.लॉक डाऊन सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या कार्यक्ष्ममतेवर कोणताही परिणाम न होऊ देता उलट आपल्या कार्याला पूरक असे उर्जास्त्रोत कसे निर्माण होतील आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबल कसे उभारता येईल याचा जो आभ्यास केला गेला, आणि तो प्रत्यक्षात कसा अंमलात आणला गेला याचं वर्णन या पुस्तकात केलं आहे.

लॉक डाऊनचा बहुतेक सर्व व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत असताना देखील काही मंडळी आव्हान म्हणून आपल्या व्यवसायावर आलेल्या संकटाचा हाती असलेली तुटपुंजी यंत्रणा हाताशी घेऊन कशी सामना करत होती, यातून त्यांना कोणते अनुभव आणि अडचणी आल्या यांचं वर्णन लेख टीमने या पुस्तकातून केलं आहे.

रोजच्या घरगुती वापरात लागणाऱ्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांपासून अगदी परदेशी निर्यात होणाऱ्या मालापर्यंत वस्तूंचा पुरवठा या लॉक डाऊनच्या काळात कसा केला, त्यासाठी समाजातल्या काही घटकांचा कसा हातभार लागला याचं वर्णनही या पुस्तकातून आढळतं. 

आलेल्या नैसर्गीक आपत्तीचा फार मोठा गाजावाजा न करता सहजपणे स्वीकार करणं आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणं हे अनेक नागरिकांनी कर्तव्य म्हणून हेच उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवलं. या आपत्तीच्या काळात दूरदर्शन आणि वृत्तपत्रांमधून जि नकारकता पसरवली जात होती त्याबद्दलही बऱ्याच सकारात्मक विचार करणाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दैनंदिन जीवनात या आपत्तीच्या काळात फारसा फरक जाणवू दिला नाही इतक्या सकारात्मक वृत्तीने आपण या आपत्तीचा कसा सामना केला याच परिणामकारक व उद्बोधक वर्णन लेखकांच्या समूहाने या पुस्तकातून मांडले आहे.

सुनिधी Positive टीम