-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा
Book Details
- Edition:2017
- Pages:292 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-864-4638-1
मानवी जीवनाची दिशा आणि दशा यांचा परस्परपूरक असलेला संबंध या पुस्तकातून लेखकाने वाचकांसमोर ठेवला आहे. जीवनाचे उद्दिष्ठ आणि त्या विपरीत त्याचा शिक्षण आणि नोकरी-व्यवसायातून अनिच्छेने चाललेला प्रवास त्याला कुठे घेऊन चालला आहे याचं उद्बोधक वर्णन पुस्तकातून केलेलं आढळतं.
सर्वांगाने परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल, आर्थिक विवंचनातून आणि मानसिक ताण-तणावातून मुक्तता हवी असेल तर जीवनाचे प्रेरणादायक नियोजन कसे असावे हे परिणामकारकरित्या मांडले आहे.शालेय विद्यार्थ्यांसमोर पालकांनीं जीवनाकडे पाहताना सतत स्पर्धेचेच अनुभव असलेली संकल्पना हाच ठेवलेला घातक दृष्टीकोन त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कसा घातक आहे हे लेखकाने वर्णन केले आहे. बालपणापासूनच पालकांच्या च् विचारांच्या आणि अपेक्षांच्याखाली दबलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
प्रत्येकाची यशस्वी जीवनाची व्याख्या सारखी नसते. आर्थिक सुबत्तेबरोबरच आवडीच्या क्षेत्रात काम करत असल्याची सतत सुखद जाणीव होत राहणे ही तितकेच महत्वाचे असते. शैक्षणिक जीवनात आयुष्याचा बहुमुल्य वेळ आवडीच्या नसलेल्या आभ्यासासाठी घालवून, समाधानकारक क्षेत्रात काम करायला मिळत नसेल तर ती आर्थिक सुबत्तादेखील मनःशांती देत नाही.
शिक्षण व्यवस्थेत आवश्यक असलेल्या सुधारणादेखील लेखकाने प्रभावीपणे मांडल्या आहेत. शिक्षणातून मिळालेली नोकरी आर्थिक सुबत्तेकडे नेऊ शकेलच असे नाही, त्यासाठी शिक्षणाबरोबरच आपले उद्दिष्ठ गाठण्यासाठी अंगी असलेल्या इतर गुणांचा विकासही तितकाच महत्वाचा असतो, हा विचार लेखकाने स्पष्ट केला आहे. यातील एक महत्वाचा गुण म्हणजे अपयशाने खचून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. लेखकाने या पुस्तकातून विविध सिद्धांतांची मांडणी करून आपली उद्दिष्ठे, ति गाठ्ण्यासाठीचा ध्येयमार्ग, अंगी बाणावी लागणारी चिकाटी आणि निरंतर प्रयत्न या द्वारे आर्थिक सुबत्तेबरोबरच मानसिक स्वास्थ कसे हस्तगत करावे या बाबतीत या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे.
सिद्धार्थ शर्मा
लेखक हे सक्सेस माँक परफाँरमन्स कन्सल्टिंग संस्थेत सिईओ आहेत.