-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
आयडियाज् दँट हँव वर्क्ड्
Book Details
- Edition:2014
- Pages:325 pages
- Publisher:Sunidhi Publishers
- Language:Marathi
- ISBN:978-81-927375-4-6
ideas that have worked या मूळ इंग्रजी पुस्तकातील २० लेखांचा अनुवाद करून बनवलेले हे पुस्तक आहे.भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये देशातील ज्या मान्यवर उद्योजकांचा, शास्त्रज्ञांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा हातभार लागला त्या दिग्गजांनी एका व्याख्यानमालेत मांडलेल्या आपल्या यशापयशांच्या विचारांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे.
या दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात प्रचलित संकल्पनांपलीकडे जाऊन जी स्वप्ने पाहिली ती अथक परिश्रमांनी साकार ही केली. या खडतर प्रवासादरम्यान आलेल्या अडचणी आणि आव्हाने यांचे वर्णन या पुस्तकातून आले आहे, जे आजकालच्या युवा पिढीस आदर्शनीय आहे.
आपल्या यशाचे वाटेकरी म्हणून आपला सहकारीवर्ग आणि कामगारवर्ग यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आहे. देशात झालेल्या हरित क्रांती पासून ते औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीत झालेल्या लक्षणीय वाढीचा संदर्भ या पुस्तकातून आला आहे. वाहन उद्योगात, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तसेच अणु, अंतरीक्ष आणि आणि संरक्षण तंत्रज्ञानातील देशाच्या समर्थ प्रगती मुळे या विभागांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. देशातील या दिग्गजांच्या मते देशाला भौतिक आणि मानसिक बंधनातून मुक्त करण्यास तंत्रज्ञान हे एक प्रभावी अस्त्र आहे.
मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समूहाने निर्माण केलेल्या जामनगरच्या देशातील सर्वात मोठ्या सदाहरित शुद्धीकरण प्रकल्पाची माहिती या पुस्तकातून अंबानींनी दिली आहे. या प्रकल्पाची उपयुक्तता आणि कार्यक्षमता पाहता व त्यासाठी वापरलेली साधन सामुग्री आणि मनुष्यबळ पाहता विकसित देशातील अशाप्रकारच्या प्रकल्पाच्या तोडीसतोड हा प्रकल्प आहे हे मानावे लागेल. कोणताही महत्वाचा प्रकल्प राबवताना हाती असलेली साधन सामुग्री, मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधा यांचे उत्तम आयोजन आणि कार्यक्षम वापर कसा करून घ्यावा, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी केले आहे.