-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
माहिती अधिकारातून पत्रकारिता
Book Details
- Edition:2019
- Pages:223 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8479-4
वर्षानुवर्ष कैक गैर व्यवहारांच्या नोंदी, फाईली या लोकांसमोर न येऊ देता दडऊन ठेवल्या जात होत्या. माहिती अधिकार कायद्यामुळे अशी कागदपत्रे आणि त्या मार्फत झालेले गैर व्यवहार उघड करता येऊ लागले.
भ्रष्टाचाराची कीड आज सर्वच क्षेत्रात पसरली असताना जनतेच्या पैशाचं लुटालूटीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने माहिती अधिकार कायद्याला महत्व आलं. या कायद्याद्वारे सार्वजनिक व्यवहाराबद्द्लची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना मिळाला. त्यासाठी घ्याव्या लागलेल्या परिश्रमांचे वर्णनही लेखकाने या पुस्तकातून केले आहे
.पूर्वी सहजासहजी उपलब्ध न होऊ शकणारी माहिती अधिकृतरीत्या मिळवण्याच्या दृष्टीने या कायद्याला असलेलं महत्व या पुस्तकातून वर्णन केलं आहे. त्याचा वापर विविध माध्यमांनी अतिशय प्रभावीपणे केल्यामुळे भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात कमी झाला. देशाच्या न्यायालायांपासून ते गावपातळीवरील कोणत्याही शासकीय कार्यालयातील गोपनीय माहिती जनतेसमोर आणून त्यातून झालेले आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणण्यात प्रसार माध्यमांनी बजावलेली महत्वाची भूमिका लेखकाने वर्णन केली आहे.या कायद्याची पारदर्शकता तपासण्यासाठी आपल्या अभ्यासू आणि चिकित्सक पत्रकारितेच्या विविध पैलूंचा आपण कसा वापर केला हे वर्णन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.
तत्कालीन शासकीय कार्यालयांमधून झालेल्या आर्थिक व्यवहारांची, आयपीएस आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारांची. मंत्र्यांच्या परदेशी प्रवास दौऱ्याची प्रकरणे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने या कायद्याचा आधार घेऊन, लेखकाने आपल्या पत्रकारितेचा कसा मेळ घातला याचं सविस्तर वर्णन या पुस्तकातून आलं आहे.
श्यामलाल यादव
लेखक हे इंडिअन एक्सप्रेस, नवी दिल्ली येथे वरिष्ठ संपादक आहेत. ते आरटीआयच्या माध्यमातून शोध पत्रकारितेसाठी जागतिक स्तरावर सुपरिचित आहेत.