-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारतातील बौद्धधम्म
Book Details
- Edition:2016
- Pages:387 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0713-0
पुरोगामी विचारांच्या अनेक विचारवंतांनी भारतातील जातीविरुध्ह उभे ठाकत आजवर बरेच लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाने भारतीय संस्कृतीत अनेकविध अंगांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यात भर टाकणारे हे पुस्तक आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जगाला बदलणारा धर्म' या बौध्द धर्माच्या संकल्पनेच्या त्यांना अपेक्षित अशा स्वरूपावर प्रकाश या पुस्तकातून लेखिकेने टाकला आहे.भारतीय समाजात झालेल्या क्रांतीवर पूर्वापार चालत आलेल्या ब्राम्हणी परंपरा आणि बौध्द धम्म यांच्यातील इतिहास आहे, या बाबासाहेबांच्या विचाराशी मिळते-जुळते विचार या पुस्तकातून लेखिकेने मांडलेले आढळतात.
बौद्द्धम्माच्या पायाभूत तत्वांवरही या पुस्तकातून विस्तृत लिखाण केलेले आढळते.पुढेपुढे सरकणाऱ्या काळाबरोबरच धर्माची व्याख्या,तिचा मूळ गाभा आणि त्यातून मिळत गेलेली शिकवण यात लवचिकतेचा आभाव लेखिकेला जाणवतो.धम्म या संकल्पनेची खूप संकुचित व्याख्या पुढे येऊन ती धर्मापुर्तीच मर्यादित राहिली याकडेही लेखिकेने वाचकांचे लक्ष वेधले आहे.
ब्राम्हणी परंपरा, तिचे विचार आणि त्यातून दलित समाजाच्या गुलामगिरीचा झालेला उदय लेखिकेने त्या काळातील समाजसुधारकाच्या कार्याचा हवाला देऊन या पुस्तकात वर्णन केला आहे.