-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
दलित समाज-सामुहिक विधीलीखिताच्या शोधात
Book Details
- Edition:2017
- Pages:350 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-859-8532-4
स्वातंत्रपूर्व काळामध्ये काहीसा मागासलेला, शिक्षणापासून वंचित राहिलेला दलित समाज आपल्या सर्वांगीण विकासासाठी,समाजामधे इतर घटकांच्या बरोबरीचे स्थान मिळावे यासाठी नेहमीच झगडत आला आहे.याच विषयाला अनुसरून लेखकाने आजवर या समाजाला मिळालेल्या सवलती,अधिकार आणि त्या मिळवून देण्यासाठी केलेल्या सामाजिक आणि घटनात्मक तरतुदींचे अध्ययन या पुस्तकात केलेले प्रामुख्याने आढळते.
लेखकाने ग्रामीण तेच शहरी पातळीवर या समाजाच्या भल्यासाठी वेळोवेळी राबविलेल्या योजना , त्यांच्या हक्कांचे केलेले संरक्षण आणि त्यातून त्यांच्या झालेल्या उन्नतीचे वर्णन या पुस्तकात केलेले आढळते. शिक्षण,रोजगार,निर्मिती, शासकीय नोकऱ्यांमध्ये दलित समाजाला दिलेल्या झुकत्या मापाचे आणि त्यातून त्यांच्या उन्नतीसाठी निर्माण झालेल्या संधीचे परिणामकारक वर्णन केलेआहे.
ग्रामीण भागामध्ये आजही दलित वर्ग जातीवादी भावनेमुळे रोजगारापासून कसा वंचित राहिला आहे हे वास्तवही लेखकाने परिणामकारकपणे मांडले आहे.