-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
अमुल्य कन्यारत्ने
Book Details
- Edition:2018
- Pages:190 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-528-0415-3
आपले शिक्षण नुकतेच पूर्ण करून यशस्वी भावी जीवनासाठी करीयरच्या समोर असलेल्या अनेक वाटांची संधी असलेल्या आजकालच्या मुलींचा, आणि त्याआधीच्या पिढीतील मुलींच्या शिक्षण आणि करिअर बद्दलच्या संधी आणि आशाअपेक्षांचा आभ्यास हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे.
शिक्षणाच्या, करिअरच्या संधी जशा वाढत गेल्या, आजच्या मुलींकडून पूर्वीच्या पिढीतील मुलींपेक्षा जास्त आशाअपेक्षा ठेवल्या जाऊ लागल्या आहेत हा मतप्रवाह या पुस्तकातून आला आहे.
केवळ पूर्वीच्या अभ्यासाच्या आधारावर अध्ययन न करता लेखिकेने शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या आणि स्वतःच्या करिअरबद्दल उत्सुक असणाऱ्या काही मुलींच्या मुलाखतींद्वारे या विषयाचं विश्लेषण या पुस्तकातून मांडल आहे. आजकाल प्रत्येक मुलीला शिक्षणाचा असलेला हक्क, स्वतःच्या शिक्षणायोग्य रोजगाराची असलेली संधी त्यासाठी कुटुंबाकडून मिळणारे प्रोत्साहन, त्यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा या विषयांची मांडणी लेखिकेने या पुस्तकातून केली आहे.
करिअरच्या महत्वकांक्षातून या मुलींच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर काय परिणाम झाले, शिक्षण आणि करिअरच्या माध्यमातून मुलींना स्वत्वाची झालेली जाणीव, कुटुंबामध्ये तीच निर्माण झालेलं आदराचं स्थान हे विषयही लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपुढे मांडले आहेत.
अलिस डब्ल्यू. क्लार्क
इतिहासकार- भारतातील लिंगभेद आणि समाज याच्या अभ्यासक