-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
अटलांटिक गांधी- सागरापार महात्मा
Book Details
- Edition:2019
- Pages:255 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8237-0
- Translated by:????? ???
महात्मा गांधी हे केवळ भारतापुरतं मर्यादित आणि संकुचित व्यक्तिमत्व नसून सात समुद्रापार त्यांची कीर्ती पसरली होती, हे वास्तव लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे.
आफ्रिकेतून भारतात परतलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीने अंगावर एक वस्त्र परिधान करून स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखोंचा जनसागर उभा करणं आणि अहोरात्र झटणं हा प्रवास कसा घडत गेला,याच वर्णन या पुस्तकात वर्णन केलं आहे.एका अर्थाने स्वदेशाशी असलेली नाळ तुटलेला एक तरुण त्याची स्वदेशाशी केवळ नावापुरती म्हणण्यासारखी असलेली पार्श्वभूमी पुस्तकातून वर्णिली आहे.
परदेशी प्रवासात भारतीय मजुरांची तिथे असलेली वाईट अवस्था गांधीजींच्या काळजाला भिडते. तिथूनच त्यांच्या वांशिकवाद आणि सामाजिक असमानता यांच्या विरुद्धच्या लढ्याची सुरवात झालेली या पुस्तकात वर्णन केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आलेल्या धक्कादायक अनुभवातून गांधीजी हे असामान्य व्यक्तिमत्व कसं घडलं हे देखील वर्णन या पुस्तकातून परिणामकारकपणे मांडलं आहे.
नलिनी नटराजन
मानवविज्ञान महाविद्यालय,पोर्टो रीको विद्यापीठ येथे इंग्रजी विभागात प्राध्यापिका