-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
गांधी आणि अली बंधू
Book Details
- Edition:2918
- Pages:220 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-528-0844-1
परदेशातल्या चळवळीचे भारतातल्या ब्रिटीशांविरोधात सुरू झालेल्या चळवळीशी असलेले साम्य आणि त्यातून गांधीजींच्या विचारांशी मिळत्याजुळत्या विचारांच्या दोघा अली बंधूंच्या मैत्रीचे आणि त्यातून अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाचे केलेले हित रक्षण या पुस्तकातून मांडले आहे.
विसाव्या शतकात दक्षिण आफ्रिकेत अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणासाठी सुरू झालेल्या चळवळीचा संदर्भ भारतातील खिलाफत चळवळीशी आढळून येतो.याच चळवळीदरम्यान गांधीजींची महम्मद आणि शौकत या अली बंधूंशी आलेला संपर्क आणि त्यातून मैत्रीचे जुळलेले नाते याचं वर्णन या पुस्तकातून आढळतं.गांधीजींवर समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून केली गेलेली टिका कुठेतरी धार्मिक वादातून केली गेल्याचं लेखकाला जाणवतं. अशावेळी अली बंधूंची मिळालेली साथही महत्वपूर्ण ठरते.
दोन धर्मातील भिन्न असलेल्या साप्रदायिक अस्मितेच्या अस्तित्वाचा स्वीकार हा नैतिकच आहे, या गांधीजींच्या विचारांशी मिळतेजुळते विचार अली बंधूंच्या त्यांच्याशी झालेल्या अतूट मैत्रीच्या नात्यातून जाणवतात. मुस्लीम बांधव जोवर अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतील तोवर त्यांच्या हक्कांसाठी मनपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत या गांधीजींच्या विचारसरणीशी मिळतेजुळते अली बंधूंचे विचार लेखकाने परिणामकारक मांडले आहेत.
गांधीजींच्या सविनय कायदेभंग आणि असहकार या दोन तत्वांचा अली बंधूंनी स्वीकार करणे स्वीकार करणे हे देखील त्यांच्यातील सौदाहर्याच्या संबंधाचे गमक म्हणून लेखकाने या पुस्तकातून केलेआहे.
राखहरि चटर्जी
कलकत्ता विद्यापीठाचे यु.जी.सि. मानद सदस्य, प्राध्यापक