-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
आरएसएस, शालेय पाठ्यपुस्तके आणि महात्मा गांधीजींची हत्या
Book Details
- Edition:2018
- Pages:128 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-528-0834-2
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय हिंदुसमाजात पसरविलेल्या कट्टर हिंदुत्व वादाची परिणीती गांधीजींच्या हत्येत झाली हा सर्वसाधारण विचार या पुस्तकातून पुढे येतो. गांधी हत्या ही एका कुणा सणकी मनोवृत्तीच्या व्यक्तीचे कारस्थान नसून एका सुनियोजित कटाचा तो भाग होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या हत्येमागची भूमिका जरी सिध्द झाली नसली तरी, शालेय जीवनात विद्यार्थीदशेपासूनच दोन समुदायांमध्ये धार्मिक तेढ वाढवण्याचे पद्धतशीर प्रयत्न कसे केले गेले याचे वर्णन या पुस्तकातून आले आहे.ऐतिहासिक घटनांचा विपर्यास, छोट्या-मोठ्या पातळीवरच्या दोन गटांमध्ये झालेल्या चकमकींना धार्मिक रंग देण्याचे झालेले पद्धतशीर प्रयत्न, त्यातच पाकिस्तानची निर्मिती होताना भारताला सहन करावा लागलेला आर्थिक बोजा अशा विविध घटनांचा सामाजिक तेढ निर्माण करण्यास उपयोग करून घेण्यात आला.
आधुनिक राष्ट्रवादाच्या उदयापासून अस्तित्वात असलेल्या संप्रदायवादाच्या आव्हानाने संपूर्ण देशात अक्राळविक्राळ रूप धरण केले होते. अशावेळी संप्रदायी शक्तींनी तळागाळाच्या स्तरावर आपल्या द्वेषपूर्ण विचारधारेचे विष पसरविले होते. किशोर अवस्थेतील मुलेही त्याची शिकार झाली. लेखकाला गांधीजींच्या हत्येचे षड्यंत्र हा त्यातूनच आलेल्या तिरस्काराचा परिणाम वाटतो.
संप्रदायी शक्तींपासून शालेय शिक्षणासारख्या क्षेत्रामधून बाल मनांवर विपरीत परिणाम होऊ नयेत ही या पुस्तकातून लेखकाची रास्त अपेक्षा जाणवते. संप्रदायी विचारांची विषवल्ली समाजात पसरविण्यासाठी इतिहासातल्या काही घटनांचा आणि वादग्रस्त ऐतिहासिक वास्तूंचा कसा खुबीने वापर करून घेतला गेला हे वर्णन या पुस्तकातून आलेले आढळते. त्यातूनच त्याकाळातील काही नेत्यांचा भारताला एकात्म आणि एकसंध राष्ट्र मानण्याला असलेला विरोध आणि देशातील दोन समाजांमध्ये पसरविली गेलेली स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना भारतामध्ये साम्प्रदायीभाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरली, ही मते लेखकाने या पुस्तकातून मांडली आहेत.