-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
प्रतीक्षानगर
Book Details
- Edition:2022
- Pages:२०० pages
- Publisher:Sunidhi Publishers
- Language:Marathi
- ISBN:978-93-85262-43-2
- Translated by:?????? ??????
भारतामध्ये सामान्य नागरिक, राजकारणी आणि प्रशासन यांच्यातील संबंध चमत्कृतीपूर्ण आहेत. अलीकडच्या काळात रोगराई, स्थलांतरं हे प्रश्न या तिघांनी भेडसावत आहेत. यातील प्रत्येकजण सभोवतालच्या परिस्थितीचा सोयीस्कर अर्थ कसा लावतो, लिसा बर्कमन प्रस्तुत संशोधिकेतून याच प्रश्नांवरती प्रकाश टाकतात. शहरीकरणाबरोबर येणाऱ्या समस्यांचे वास्तव कथानक स्वरुपात मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे.
शहरातील विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन आणि त्यांच्या जगण्याचा दर्जा ही लेखकाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, आणि ते सत्यदेखील आहे. विस्थापितांसारख्या घटकांच्या जागतिकीकरणाकडे गेलेल्या नेतृत्वामुळे अधुनिकीकरण आणि शहरीकरण यांचं एक नवीन समीकरण उभारून आलं. या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या 'प्रतीक्षानगर' या झोपडपट्टीवर सलग १० वर्षे केलेल्या संशोधनावर हे प्रस्तुत पुस्तक आधारलेले आहे. शहरातील प्रशासकीय धोरणांमुळे अशा झोपडपट्ट्यांमधून राहणाऱ्या विस्थापितांचे आयुष्य आव्हानात्मक झाले आहे.
शहर विकास योजनांबरोबरच शहराच्या विस्तारीकरणाचा वाढती लोकसंख्या आणि त्याबरोबर येणारी संलग्न आव्हाने प्रशासनासमोर उभी राहतात. त्यातच कायद्यातील पळवाटा आणि त्रुटी भ्रष्टाचार आणि दलाली या गोष्टींना खतपाणी घालतात.
या सर्व परिस्थितीवर आधारलेले हे संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगणारे प्रस्तुत पुस्तक म्हणजे विस्थापितांच्या समस्यांची कहाणी सांगणारे माध्यम ठरेल यात शंका नाही.