-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारतातील लोकसंख्याविषयक समस्या
Book Details
- Edition:2019
- Pages:313 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8527-2
लेखकाने पाच दशकाहून अधिक काल भारताच्या लोकसंखेशी निगडीत समस्यांच्या केलेल्या अभ्यासाचे वर्णन आणि स्वरूप या पुस्तकातून आढळते. भारतीय लोकसंख्येचा केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातूनच विचार न होता तिची दिवसागणित होणारी वाढ,तिचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम हे चिंतेचे विषय असल्याचं लेखकाला जाणवलं. त्यातूनच स्त्री-पुरुष समानता, महिलांचे आरोग्य आणि मातृत्व स्वीकारताना असलेलं त्याचं स्वास्थ्य याचा आभ्यास लेखकाला करावासा वाटला. त्या आभ्यासाचे फलीत म्हणून लेखकाचे बहुमुल्य विचार या पुस्तकातून मांडले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्याविषयक समस्या आणि स्वातंत्र्योत्तर समस्या अशा दोन भागात लेखकाने केलेला आभ्यास प्रभावीपणे पुस्तकातून मांडला आहे. या काळात शासकीय यंत्रणांद्वारे कुटुंब नियोजनापासून ते नवजात अर्भकांच्या मृत्युच्या समस्येपर्यंत प्रत्येक पातळीवर कसे कार्य होत गेले हे वर्णन या पुस्तकात आले आहे. विवाह संस्था, त्यात आढळणाऱ्या समस्या, जाती अंतर्गत विवाहांची सफलता यांची कालानुरूप झालेली मांडणी पुस्तकातून वर्णिली आहे. लोकसंख्या आणि तिच्या समस्यांची इतर विकसित देशातील समस्यांशी कोष्ठकांतून तुलनात्मक आकडेवारी दिली आहे. लोकसंख्येचा प्रमुख घटक असलेल्या बालकांच्या कुपोषण समस्येवर देखील लेखकाने प्रकाश टाकला आहे. देशांतर्गत राज्यांचा तुलनात्मक आभ्यास करताना काही राज्यात परदेशातून स्थलांतरित झालेल्या वाढीव लोकसंख्येचे झालेले दुष्परिणामही लेखकाने या पुस्तकातून अभ्यासले आहेत.
बी.एन.घोष
लेखक हे लीड्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी युके ,युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स पेनांग येथे अभ्यासगत प्राध्यापक आहेत.