-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
इझी मनी
Book Details
- Edition:2017
- Pages:258 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0717-8
एखादा अवघड विषय समजून घेऊन त्याचे अध्ययन करायचे असेल, तर त्यावर लिखाण करणे यासारखा उत्तम मार्ग नाही ही लेखकाची या पुस्तकाच्या निर्मिती मागची प्रेरणा असल्याचे जाणवते. हाती असलेल्या नगण्य संदर्भातून, लेखनाच्या विषयाचं निश्चित स्वरूप नसण्याच्या पार्श्वभूमीतूनही एखादी उत्कृष्ठ साहित्य निर्मिती होऊ शकते या लेखकाला आलेल्या अनुभवातूनच या पुस्तकाच्या निर्मितीचं बीज रोवलं गेलं हे लेखकाने दिलेल्या उदाहरणावरून लक्षात येतं.
मानवी जीवनाची सुरुवात झाली तसा त्याचा अर्थशास्त्रावर आधारित प्रवासही सुरू झाला. सुरुवातीला परस्पर वस्तू विनिमय हेच अर्थशास्त्राचे असलेले प्राथमिक रूप कसे बदलत गेले याचे वर्णन लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे. हाती असलेल्या साधनांतून आणि अंगी असलेल्या कौशल्यातून निर्माण झालेल्या वस्तूंचादेखील चलन म्हणून वापर होऊ लागला, जशा मानवी गरजा वाढल्या आणि नवनवीन शोध लागले वस्तू विनिमय ही संकल्पना बाजूला सारून,मानवाने चलनाचे संशोधन केले.परस्पर विनिमय हाच मुळचा पाया असलेले चलन हे वस्तू स्वरूपातच होते.
कालांतराने त्याला धातूंची नाणी, चलनी नोटा असे रूप प्राप्त झाले. त्यातूनच दुर्मिळ धातूंचा देखील चलन म्हणन वापर होऊ लागला. हे विचार लेखकाने पुस्तकात मांडले आहेत. विविध बँकांची न्रीर्मिती झाली तसा प्रत्यक्ष चलनाचा वापर काहीसा कमी झाला. अशावेळी चलन फुगवटा निर्माण होऊन त्याचा देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
विवेक कौल
लेखक हे डेली न्यूज अँड अँनालिसिस आणि द इकॉनॉमिक टाइम्स ह्या वृत्तपत्रांमधे उच्च पदांवर काम केले आहे.भारतातील विविध प्रकाशनांमधून त्यांचे लेखनप्रसिध्द झाले आहे.