-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारतीय अर्थव्यवस्थेची संक्रमणावस्था
Book Details
- Edition:2019
- Pages:351 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8204-2
अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून भारताच्या साधारण ९० च्या दशकातील संक्रमणावस्थेतून जाताना अर्थशास्त्रावर प्रभाव पाडलेल्या अनेक संज्ञांचा लेखकाने या पुस्तकातून उहापोह केला आहे.
या काळात खाजगी क्षेत्रातले व्यवसायधंदे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा झालेला विस्तार याने जागतिक गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास मदत झाली आहे. याच काळात एकीकडे जागतिक मंदीला आणि दुसरीकडे लोकसंख्या वाढीच्या समस्येतून अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांना भारताने यशस्वीपणे तोंड दिले.
याकाळात देखील हवाई वाहतुकीपासून ते ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यात येऊन लघुउद्योग, व्यापार आणि इतर सेवांमधून रोजगारनिर्मिती होण्यास मदत झाली.या काळात कृषी आणि सिंचन विकास कार्यक्रमातील बहुमुल्य गुंतवणूकीमुळे हरितक्रांती होऊन भारताच्या अन्नधान्य उत्पाद्नाच्याबाबतीत स्वयंपूर्णता आली.
या कालखंडातल्या संक्रमणावस्थेतून जाताना अर्थव्यवस्थेला तोंड द्याव्या लागलेल्या समस्यांचे आणि आव्हानांचे या पुस्तकातून लेखकाने वर्णन केले आहे. जागतिकीकरणामुळे भारतातील व्यापार आणि त्यातील गुंतवणुकीवर पडलेला प्रभाव, मोठ्या प्रमाणावर झालेली भाववाढ,ग्रामीण भागातून रोजगारासाठी होणारे मजुरांचे स्थलांतर याचे वर्णनही लेखकाने या पुस्तकातून केले आहे.संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अहवालाद्वारे लेखकाने इतर विकसनशील देशातील संक्रमणावस्थेच्या तुलनेत भारतातील सामाजिक,औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेल्या बऱ्या-वाईट परिणामांचे विश्लेषण मांडले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वृद्धी होत असतानादेखील आजही गरिबी आणि सामाजिक विषमता या अर्थकारणावर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींचाही आभ्यास या पुस्तकातून केलेला आढळतो.
ग्रामीण भागातील श्रमिक बाजारपेठेत संक्रमणावस्थेमुळे घडलेले बदल आणि त्यातून श्रमिकवर्गाचे शहरी भागात झालेले स्थलांतर लेखकाने कोष्टकातून आकडेवारीसह मांडले आहे.भारतातील अर्थकारणाच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीमुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांचा विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा आभ्यास ही या पुस्तकातून मांडला आहे. औद्योगी विकास, पर्यावरण, प्रदूषण आणि त्यांचे फायदे-तोटे यांचा महत्वाचा सूक्ष्म आभ्यासही लेखकाने या पुस्तकातून मांडला आहे.
एस.जनकराजन,एल.वेंकटाचलम,आर.मारिय सलेथ
एस.जनकराजन- साउथ एशिया कॉन्साँँटिियम फॉर इंटरडिसिप्लीनरी वाँँटर रिसोर्सेस स्टडीज हैद्राबादचे अध्यक्ष आहेत.
एल.वेंकटाचलम-एमआयडीएस चेन्नई येथे प्राध्यापक aahet
आर.मारिय सलेथ- हे मद्रास स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मानद प्राध्यापक आहेत.