अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. विकासाचे अर्थशास्त्र
292 325
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

विकासाचे अर्थशास्त्र

सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने By: सय्यद नवाब हैदर नक्वी ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:251 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0400-9

भारताच्या दरडोई उत्पन्नातील वाढ,आर्थिक स्थितीवरून श्रीमंत आणि गरीब अशा दोन गटातून जाणवणारी विषमता,त्यातून होणारे संपत्ती वाटप आणि त्यातील तफावत कमी करून बहुसंख्य लोकसंखेस गरिबीरेषेवरून सुबत्तेकडे नेणे या सर्व बाबींच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणे हे या पुस्तकाच्या लेखानामागचे उद्दिष्ठ आहे.

भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला विकासाच्या प्रक्रियेतून जाताना आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांवर केलेले आभ्यासात्मक विश्लेषण या पुस्तकातून मांडले आहे. विकसनशील देशांना सामोरे जावं लागलेल्या आर्थिक मंदी, भाववाढ,बेरोजगारी यासारख्या समस्यांमुळे अर्थव्यवस्था निराशेकडे झुकण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी मध्यमवर्गीय समाज आणि उच्चवर्ग यांच्यातील विषमता कमी करण्यासाठी योग्य आर्थिक आणि विकास धोरणे राबवून ती पेलण्याचे आव्हान विकसनशील देशांपुढे होते, विकसनशील  त्या आव्हानास कसे सामोरे जावे, त्यासाठी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या सगळ्या घटकांचा कसा क्रांतिकारी उपयोग करून घ्यावा , हे या पुस्तकातून स्पष्ट केले आहे.

लेखकाने पुस्तकाच्या उत्तरार्धात मानवी विकास उपक्रम आणि त्याचे महत्व अधोरेखित केले आहे.मानवी विकासावर परिणाम करणाऱ्या उत्पंन आणि संपत्तीमधील विषमतेवर मात करून विकास निर्देशांकात वाढ करण्यासाठी मानवी विकास उपक्रमांचे योगदान कसे निर्णायक ठरते,हे स्पष्ट केले आहे.

एकूणच विकसनशील देशांनी एक प्रबळ अर्थव्यवस्था म्हणून उभारण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यावर आणि त्याद्वारे सर्वसमावेशक विकास साध्य करण्यावर कसा भर द्यावा याचे विश्लेषण या पुस्तकातून आढळते.

सय्यद नवाब हैदर नक्वी

लेखक एचईसी डिस्टिंग्विश्ड नँशनल प्रोफेसर,फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स व टेक्नाँलॉजी, इस्लामाबाद