अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. शहरे आणि सार्वजनिक धोरण
447 525
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

शहरे आणि सार्वजनिक धोरण

भारतीय शहरी प्राधान्यक्रम By: प्रसन्न के. मोहंती ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:338 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0959-2
  • Translated by:?????? ???????

लेखाकाने या  पुस्तकातून शहरांच्या आर्थिक सिद्धांताचे आणि भारताचा नागरी कार्यक्रम विकसित करण्यासाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नागरी व्यवस्थापनातील सर्वोत्तम प्राधान्याचे धडे दिले आहेत.याद्वारेच या पुस्तकातून आर्थिक विकासाकरिता सार्वजनिक वित्त आणि वृद्धीला पूरक ठरू शकणारी शहरांची भूमिका अधोरेखित केली आहे. 

प्रस्तुत पुस्तकातून शहरीकरणासाठी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षांची मिमांसा करताना लेखकाने आपल्या विविध शासकीय पदांवर असताना आलेल्या समस्या आणि त्या सोडविताना आलेल्या अनुभवाचे वर्णन पुस्तकातून केले आहे. पुस्तकाचे लिखाण करताना लेखकाने आशावादी दृष्टीकोन ठेवला आहे, लेखकाने कृषी आणि औद्योगिक क्रांतीबरोबरच नागरी क्रांतीलाही तितकेच महत्व देऊन त्यावर आभ्यासही केला आहे.

देशापुढील अनेक समस्यांवरील उपायांचे भवितव्य प्रामुख्याने नागरीकरणाच्या संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यावर आहे असे मत लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे.वाढत्या प्रमाणावरील शहरीकरणाचे परस्पर पूरक असणाऱ्या उद्योगसंस्थांना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे,व्यवसाय व्याप्तीचे,लाभ मिळतात हे विचार लेखकाने मांडले आहेत. त्याचा फायदा उद्योगसंस्था आणि कामगारवर्ग यांना होतो हे लेखकाने स्पष्ट केले आहे.

भारत संक्रमणावस्थेतून जात असताना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध असताना, धोर्ण्कार्तेआनी नियोजान्कारांची भूमिका किती महत्वाची आहे हे वर्णन या पुस्तकातून आले आहे. लेखकाने अतिरिक्त शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींबरोबरच लोकसंख्या वाढीमुळे शहरी नियोजनावर होणारे दुष्परिणाम ही अभ्यासले आहेत. 

प्रसन्न के. मोहंती

लेखक हे हैदराबाद विद्यापीठात अर्थशास्त्राचे चेअर प्रोफेसर आहेत. ते आंध्र प्रदेश शासनात मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.