राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. परिकल्पित हिंदुत्ववाद
535 595
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

परिकल्पित हिंदुत्ववाद

ब्रिटिश प्रोटेस्टंंट मिशिनरीकृत हिंदुत्ववादाची रचिते, १७९३-१९०० By: जेफ्री ए. ऑडी ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:350 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8610-1
  • Translated by:?????? ??????

प्रस्तुत पुस्तक हे १७८९ ते १९०० या कालखंडात ब्रिटिश प्रोटेस्टंट धर्मप्रचारकांमध्ये विकसित झालेल्या हिंदुत्ववादाच्या संकल्पनेचा उगम आणि तिची परिष्करणे यांचा शोध घेते. स्वतःची भिन्न अशी परंपरा असल्याने त्यातूनच 'हिदुत्ववाद' ही संकल्पना आकाराला आली. हिंदू धर्म परंपरांविषयी ब्रिटीश आणि युरोपीय संकल्पनांचा उगम व त्याचा प्रोटेस्टंट धर्म प्रचारकांच्या आकलनावर कसा प्रभाव पडला हे वर्णन या पुस्तकातून आले आहे.

त्यातूनच हिंदुत्व या संकल्पनेचे धर्मप्रचारक आणि आभ्यासकांकडून अर्थ लावण्यावरून वाद सुरू झाले आणि हिंदुत्ववादाच्या केलेल्या मांडणीतून दोन विचारसरणीमधे चर्चाविश्व उभे केले. लेखकाने या पुस्तकातून या चर्चाविश्वातून हिंदुत्व या संकल्पनेविषयी धर्मप्रचारकांमधे कोणते प्रतिबिंब उमटले याचा आभ्यास केला आहे.हिंदुत्ववादाचे जे स्वरूप या अभ्यासकांसमोर आले त्याची मांडणी आणि मूल्यमापन त्यांनी कसे केले हे वाचकांसमोर आणण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.

लेखकाला त्यातून हिंदुत्ववादाविषयी आश्चर्यकारकरित्या द्वेषभावना आणि सहानुभूती अशा भिन्न दृष्टिकोनांचे मतप्रवाह आढळून आले. हिंदु धर्मात अढळलेल्या संन्यासी व्रत  धारण केलेल्या व्यक्ति, त्यांची वेशभूषा,  त्यांचे उग्र स्वरूप आणि त्या बरोबरीने येणाऱ्या पारंपरिक रूढी-रिती यांचा संबंध लेखकाने हिंदुत्ववादाशी जोडला आहे. त्यांच्या तपश्चर्या करण्याच्या पद्धतीचे अभ्यासकांना वाटणारे आश्चर्य आणि कुतूहलही लेखकाने या पुस्तकात वर्णन केले आहे. लेखकाने प्रस्तुत पुस्तकातून हिंदू धर्मात असणाऱ्या सती प्रथा, परमेश्वर प्राप्तीसाठी अन्न-पाणी त्याग, देहास विविध प्रकारच्या यातना देणे, ही युरोपीय लोकांना आणि अभ्यासकांना पाशवी कृत्ये वाटतात हे स्पष्ट केले आहे. हिंदुत्वाची सात्विक आणि वत्सल धर्मव्यवस्था म्हणून प्रतिमा निर्माण होण्यास या प्रथा व अंधश्रद्धा बाधक ठरल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे.

काही विचारवंतांच्या मते हिंदुत्ववाद या संकल्पनेचा उदय हा ब्राम्हणवादातून झाला, आणि सामान्यांना आपल्या अंमलाखाली ठेऊन त्यांची बुद्धी पंगु करण्यासाठी त्याचा वापर केला असे मत मांडल्याचे लेखकाला आढळून आले. काहींनी तर हिंदुत्ववाद ही विवेकशून्य व्यवस्था असे वर्णन करून त्यातील कमतरतांवर, कच्च्या दुव्यांवर आणि अव्यावहारिक गोष्टींवर जगाचे लक्ष वेधून घेतले.

जेफ्री ए. ऑडी

लेखक हे सिडनी विद्यापीठातील इतिहास विभागामध्ये मानद ज्येष्ठ व्याख्याते आहेत.