-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार
Book Details
- Edition:2017
- Pages:293 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0715-4
विविध विचारवंतानी आणि नामवंतांनी नावाजलेले हे पुस्तक भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करण्याचा धाडसी प्रयत्न करते. परराष्ट्रीय धोरण ठरविणाऱ्या उच्च राजनैतिक आणि प्रशासनिक पातळीवर असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर दृष्टीक्षेप टाकते.त्याचबरोबर परराष्ट्र धोरण ठरवताना त्यांनी काही धोरणात्मक पर्याय सुचविलेले आहेत.
बाह्य जगाशी असलेल्या भारताच्या संबंधांचा एकप्रकारे आढावा या पुस्तकाद्वारे घेतला आहे. शेजारी राष्ट्राच्या उन्नतीचा आणि त्यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा कसा मेळ घालता येऊ शकेल याचे उत्तम वर्णन या पुस्तकातून लेखकाने केले आहे. भारतात होणारी उत्क्रांती आणि त्याला पूरक असे परराष्ट्रीय धोरण,अर्थव्यवस्था आणि तिच्या सुबत्तेसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय या दृष्टीने किती महत्वाचे ठरते हे लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे.
एक स्वतंत्र राष्ट्र आणि त्याद्वारे स्वतःच्या हितास पोषक अशा राजनयिक कृतीचे स्वातंत्र्य व आत्मविश्वास यांचा आग्रह या पुस्तकातून लेखकाने स्पष्ट केला आहे.भारताच्या विविध प्रशासकीय पदांवर काम करताना लेखकाला आलेले अनुभव त्यातून आलेली कमालीची निर्णयक्षमता या पुस्तकाच्या लिखाणातून जाणवते. परराष्ट्र धोरण ठरविताना प्रत्येक देशाने आपल्या हिताला सर्वोच्य प्राधान्य देऊन आपले हितसंबंध जपणे हे फार महत्वाचे असते, अशावेळी लेखकाच्या मते परराष्ट्र धोरण हे विकासाचे साधन म्हणून वापरताना त्याचा विचारपूर्वक आणि परिणामकारक वापर करून घेणे आवश्यक असते.
देशांतर्गत राजकारण आणि परराष्ट्रीय धोरण हे एकमेकांपासून चार हात दूर रहावेत, हे मत लेखकाने मांडले आहे. परदेशांशी असलेल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारे व त्यातून मार्ग दर्शवणारे हे पुस्तक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
राजीव सीकरी
भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे,परराष्ट्र सचिव