राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. अस्मिता आणि धर्म
405 450
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

अस्मिता आणि धर्म

भारतातील इस्लामविरोधाचे मूलाधार By: अम्लेंदू मिश्रा, अनुवादन- देवयानी देशपांडे ,

Book Details

  • Edition:1st (2019)
  • Pages:283 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-53-28246-2
  • Translated by:Devyani Deshpande

‘अस्मिता आणि धर्म: भारतातील इस्लामविरोधाचे मूलाधार’ ही मूळ निर्मिती अत्यंत प्रभावी, ओघवती, ठाम, प्रसंगी टोकदार आणि अनेक धारणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, जवाहरलाल नेहरू, विवेकानंद सर्वज्ञात आहेत. त्यांच्या काही प्रतिमा आपल्या मनावर कोरल्या आहेत. दुर्दैवानं त्या टोकाच्या आहेत. या नेत्यांचा उदो उदो करायचा किंवा त्यांना तिरस्कारयुक्त वागणूक द्यायची असा सर्वसाधारण कल आहे. मात्र, लेखकानं तटस्थ राहून केलेलं हे लेखन या सर्वांकडे 'माणूस' म्हणून पहा, त्यांना अनावश्यक देवत्व देऊ नका असाच संदेश देतं.

त्या सगळ्या प्रतिमांवर या निर्मितीनं पुनश्च विचार करायला लावला. इस्लामबाबत आपल्या मनात अढी आहे, ती का? त्यासाठी उपरोक्त नेते जबाबदार आहेत का? हिंदुवाद, हिंदुधर्म, हिंदुत्व यातील नेमका फरक काय? ऐतिहासिक नोंदी आपल्या धारणांसाठी जबाबदार आहेत का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील आणि नवे प्रश्न निर्माण देखील होतील.

हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं, प्रत्येकाच्या संग्रही असावं इतकं मोलाचं तर आहेच पण भारतीय लेखकानं संवेदनशील विषयावर केलेल्या संशोधनपर लेखनासाठी ते विशेष उल्लेखनीय ठरतं.

अम्लेंदू मिश्रा, अनुवादन- देवयानी देशपांडे