अभिनंदन सर ! आपल्या कार्याची महती नक्कीच फार मोठी आहेच. पण आपल्या कार्याच्या मुळाशी असलेली सहृदयता व फाँलोआप घेण्याची तत्परता विशेष विलोभनीय सर
रणदीप बिस्ने
वाचक
Hats Off to you Mam....
Vaibhav Bedekar
Reader
अविनाश सर, प्रणती मॅडम आणि सगळ्या सुनिधी ग्रुपचे मनापासून अभिनंदन
नीला देशपांडे
वाचक
Heartly congratulations Madam and your team
Seema Mahadik
Reader
खरोखरचं ह्या कठीण काळातही आपण हा अनमोल ठेवा समस्त वाचकांपर्यंत पोचवण्याची सेवा समर्थपणे करत आहात त्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, मनापासून धन्यवाद
वैशाली भागवत
वाचक
प्रस्तुत ग्रंथाचा अनुवाद करण्याची संधी मला ‘सुनिधी पब्लिशर्स’चे सर्वेसर्वा श्री. अविनाश काळे यांच्यामुळे मिळाली. मी ‘सुनिधी’सोबत यापूर्वीही काही अनुवाद-प्रकल्प केलेले असल्यामुळे त्यांच्या शिस्तबद्ध आणि दर्जेदार कामाचा मला अनुभव होता. त्यामुळेही प्रस्तुत अनुवाद करण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली. ग्रंथात प्राचीन भारतीय संकल्पना आणि संज्ञांचा वापर जागोजागी असल्याने त्यांचा निश्चित अर्थ आणि संदर्भांसाठी विशेष प्रयत्न करावे लागले. अनुवादाचे काम दर्जेदार आणि वेळेत होण्यासाठी श्री. काळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिलेले सहकार्य आणि पाठिंबा उल्लेखनीय आहे. या सर्वांची मी अतिशय आभारी आहे.
डॉ मंजुषा मुसमाडे
लेखक
सर्व ऐवज मातृभाषेत उतरवताना अनुवादकाला नतमस्तक व्हावे लागते, तेही सजग राहून! हे करण्याची ताकद एकवटून माझा रोजचा दिवस उजाडत आणि मावळत होता. हे सर्व करत असताना मला प्रचंड धीर देणाऱ्या, आशयासाठी मार्गदर्शन करणाऱ्या, ‘अवघड असं काही नसतं’ असे धाकवजा प्रोत्साहन देणारे ‘सुनिधी पब्लिशर्स’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संपादक श्री. अविनाश काळे यांना प्रणाम आणि ‘सुनिधी’ चमूचे मनस्वी आभार.
श्वेता देशमुख
लेखक
पुणे येथील ‘सुनिधी पब्लिशर्स’चे श्री. अविनाश काळे आणि प्रणति काळे यांनी पुढाकार घेतल्यानेच हे पुस्तक अल्पावधीत प्रसिद्ध होत आहे. मी त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा ऋणी आहे.
प्रा. डॉ. बी. आर. जोशी
लेखक
‘सुनिधी पब्लिशर्स’चे श्री. अविनाश काळे यांच्यासह अनुवादाचे विविध पाच प्रकल्प करण्याचा योग आला. या पुस्तकाचं वेगळेपण ध्यानात घेता, हे लेखन ‘सुनिधी पब्लिशर्स’तर्फे प्रकाशित होत आहे याचा विशेष आनंद आहे.
देवयानी देशपांडे
लेखक
श्री. अविनाश काळे यांनी आस्थेने लक्ष घालून क्रिएटीव्ह टीम, सुनिधी पब्लिशर्सच्या चमूने प्रकाशनाचे किचकट काम चोख पार पाडले त्याबद्दल मी त्यांचा शतश: ऋणी आहे.
डॉ. तुषार बापट
लेखक
या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी व त्याच्या सुबक निर्मितीसाठी सुनिधी पब्लिशर्सचे श्री. अविनाश काळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी ॠणी आहे.