
आंतरराष्ट्रीय राजकारण
- By रुमकी बसू
- Publisher : सुनिधी पब्लिशर्स
- Copyrights : सुनिधी पब्लिशर्स
- ISBN No. : 9789385262821

556
Page Count
- Paperback Binding
₹599.00
Product Description
हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील मूलभूत संकल्पना, सिद्धान्त आणि समकालीन जागतिक घडामोडी समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. यात सत्तेच्या बदलत्या संकल्पना, त्यांची व्याख्या आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांतील उपयोजन यांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. नव्या अभ्यासक्रमातील प्रमुख सिद्धान्तांचा चिकित्सक आढावा घेण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना, दहशतवाद, मानवाधिकार, विकास, संरक्षण आणि पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा केली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल आणि सातत्य तसेच विविध देशांशी असलेल्या संबंधांचाही अभ्यास यात समाविष्ट आहे. प्रत्येक प्रकरणात विषयाचे सखोल विवेचन, नमुना प्रश्न आणि संदर्भग्रंथांची माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञ लेखकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक परिणामकारकरित्या समजून घेता येतो.